vidnyanlekhan_logo

विज्ञान केंद्र

विज्ञानदूत सप्टेंबर २६

बऱ्याच कालावधी नंतर पुन्हा एकदा विज्ञानदूतचा अंक प्रसिद्ध करीत आहोत.

घरोघरी भाजीबाग हा विज्ञान केंद्राचा जुना उपक्रम आहे. स्वयंपाकघरातल्या सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत कसे करता येते याची माहिती उदय आठल्ये यांनी दिली आहे तिचा समावेश या अंकात केला आहे.

लोकांमधे गणेशोत्सवाचा उत्साह आहे. त्यावेळी गणेश मूर्तींचे रासायनिक पद्धतीने विसर्जन कसे करता येते या विषयीचा उदय ओक यांचा लेख या अंकात अंतर्भूत आहे.

दुकाने, उपाहारगृहे अशा सार्वजनिक ठिकाणी विज्ञानदूतच्या माहितीपूर्ण अंकांना भरपूर वाचक मिळत आहेत. तुम्ही देखील अंकाची प्रत डाउनलोड करून (१४ सप्टेंबर २६ चा विज्ञानदूत येथे डाउनलोड करा.) तुमच्या नेहमीच्या दुकानदार/उपाहारगृहचालक/चहाकेंद्रचालक यांना विनंती करून छापील विज्ञानदूत लोकांपर्यंत पोचवू शकता.

या पुढे दर महिन्याच्या १४ आणि २८ या तारखांना विज्ञानदूत प्रसिद्ध करण्याचा आमचा प्रयत्न राहील.

#home_magazine #विज्ञानदूत