vidnyanlekhan_logo

विज्ञान केंद्र

रविवार कोडे २७०७

हे कोडे रविवार २७ जुलै २०२५ रोजी विज्ञान दैनंदिनी व तर्कविचार या उपक्रमात चर्चिले जाईल. त्यानंतर याच पानावर त्याचे उत्तर सांगितले जाईल.

कोडे २७०७

चंदू आणि बंडू यांनी आपापल्या सायकलवर वेगदर्शक उपकरणे बसवली आहेत. चतुर-चंदू उतारावर पूर्वेकडून पश्चिमेकडे ताशी ९ कि.मि वेगाने जात होता, तर बळकट-बंडू चढावर दक्षिणेकडून उत्तरेकडे ताशी १२ कि.मि. वेगाने सायकल मारत होता. कोपऱ्यावर त्यांची सायकल एकमेकांना धडकली. सुदैवाने कोणालाच इजा झाली नाही. मात्र बंडू चंदूला ओरडून म्हणाला, "तू सायकल माझ्यापेक्षा वेगाने चालवत होतास". चंदू देखील बंडूवर ओरडला "मी नव्हे, तूच सायकल माझ्यापेक्षा वेगाने चालवत होतास." जवळूनच विज्ञान केंद्राचा एक विज्ञानदूत जात होता. त्याने या दोघांनाही परिस्थिती समजावून दिली आणि त्यांचे भांडण मिटले.

  1. बंडू आणि चंदू यापैकी कोण खरे बोलत होते असे तुम्हाला वाटते ? का ?
  2. विज्ञानदूताने काय समजावून सांगितल्यामुळे हे भांडण मिटले असावे ?

#उपक्रम