पाच नवी कोडी
पुढील पाच कोड्यांपेकी एक किंवा अनेक सोडवून ती विज्ञान केंद्राला कळवावीत. त्यासाठी प्रतिसाद या पानावरील फॉर्म वापरता येईल किंवा इमेल लिहिता येईल. ही कोडी सोडवल्यावर त्यांचे सादरीकरण विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात करायचे असल्यास तसे आधी कळवावे. धन्यवाद.
कोडे क्र. ९
A clock strikes every hour -- once at 1:00, twice at 2:00, and so on. The clock takes 6 seconds to strike 5:00 and 12 seconds to strike 9:00. The time needed to strike 1 is negligible. How long does the clock need for all its striking in 24 hours?
एक घड्याळ, एक वाजता एक ठोका, दोन वाजता दोन ठोके या प्रमाणे दर तासाला ठोके देते. पाच वाजता ठोके देण्यास घड्याळाला सहा सेकंद लागतात तर ९ वाजता ठोके देण्यास घड्याळ १२ सेकंद घेते. एक ठोका देण्याचा वेळ दुर्लक्षित करण्याइतपतच आहे. तर २४ तासात हे घड्याळ ठोके देण्यास किती वेळ घेईल ?
कोडे क्र. १०
Bandoo leaves Paris, driving at a constant speed. After a while he passes a "milestone" -- ^actually a kilometer stone, of course -- displaying a two-digit number. An hour later he passes a milestone displaying the same two digits, but in reversed order. In another hour he passes a third milestone, with the same two digits (backward or forward) separated by a zero. What is the speed of Bandoo's car?
बंडू एकसमान वेगाने वाहन चालवत पॅरिसमधून बाहेर पडला तेव्हा त्याला अंतर कि.मि. मधे दर्शवणारा एक दगड दिसला. त्या दगडावर दोन आकडी संख्या होती. एका तासानंतर त्याला जो दगड दिसला त्यावर तेच आकडे उलट्या क्रमाने लिहिलेले दिसले. त्या नंतरच्या तासाने तिसऱ्या दगडावर त्याला तेच दोन आकडे (उलट किंवा सुलट क्रमाने) दिसले पण आता त्यांच्या मधे शून्य होते. तर बंडू किती वेगाने जात होता ?
कोडे क्र. ११
Bandoo is in a bicycle race on a closed circuit. After several hours of pedaling he realizes that 1/5 of the racers in front of him plus 5/6 of the racers in back of him add up to the total number of racers. How many cyclists are there in the race?
बंडूने एका वर्तुळाकार ट्रॅक असणाऱ्या सायकल शर्यतीत भाग घेतला होता. अनेक तास सायकल चालवल्यावर त्याच्या असं लक्षात आलं की त्याच्या पुढे असणाऱ्या स्वारांपैकी एक पंचमांश आणि त्याच्या मागे असणाऱ्यांपैकी पाच षष्ठांश सायकलस्वार यांची बेरीज केली की एकूण स्पर्धकांची संख्या मिळते. तर त्या शर्यतीत एकूण किती स्वारांनी भाग घेतला होता ?
कोडे क्र. १२
Bandoo is riding a bicycle on a road that can be thought of as having four parts of equal length. On the first fourth, which is level, he pedals at 10 kilometers per hour. On the second fourth, an upward slope, he goes 5 kilometers per hour. On the third fourth, a downward slope, he goes 30 kilometers per hour. On the fourth, which is level again but with the wind pushing him he goes 15 kilometers per hour. What is Bandoo's average speed?
बंडू ज्या रस्त्यावर सायकल चालवत होता त्या रस्त्याचे चार भाग पडतात. प्रत्येक भाग समान लांबीचा आहे. पहिला भाग अगदी सपाट, चढ-उतार नसलेला आहे. त्यावर बंडूने ताशी १० कि.मि. या वेगाने सायकल चालवली. दुसऱ्या भागावर चढ आहे तिथे त्याचा वेग ताशी ५ कि.मि. पडला. तिसऱ्या उतार असलेल्या भागात त्याचा दर ताशी ३० कि.मि. झाला. चौथा भाग पुन्हा एकदा सपाट, चढ उतार नसलेला आहे, त्यावेळी त्याचा वेग वाऱ्याच्या मदतीमुळे ताशी १५ कि.मि. पडला. बंडूचा सरासरी वेग किती होता ?
कोडे क्र. १३
Bandoo rents a car to drive to a city 100 kilometers away. He stops halfway and picks up a friend, who rides the last 50 kilometers with him. Returning in the evening with his friend, Bandoo drops him where he picked him up, then drives on to his starting point, where he is charged $24 for car rental. Bandoo and his friend share the expenses equitably. How much should each one pay?
बंडूने १०० कि.मि. अंतरावरच्या शहरात जाण्यासाठी एक कार भाड्याने घेतली. अर्धे अंतर कापून झाल्यावर तो थांबला आणि त्याने त्याच्या मित्राला गाडीत घेतले. संध्याकाळी त्याच्या मित्राबरोबर परतत असताना, जिथे मित्र गाडीत बसला तिथेच बंडूने त्याला उतरवले आणि उरलेले अंतर कापून बंडूने गाडी परत केली. त्यावेळी त्याला २४ डॉलर भरावे लागले. बंडू आणि त्याचा मित्र यांनी प्रवासाच्या प्रमाणात भाडे वाटून घ्यायचे असल्यास प्रत्येकाला किती खर्च करावा लागला ?