इलेक्ट्रॉनिक्स हॉबी सेंटर
प्रकल्पाची ओळख
हा विज्ञान केंद्राचा इलेक्ट्रॉनिक्सचा छंद जोपासण्यासाठीचा प्रकल्प आहे.- सहभागासाठी वयोमर्यादाः १५ वर्षांवरील कोणीही व्यक्ती.
- सहभागासाठी पात्रताः थोडे अंकगणित आणि थोडे इंग्रजी समजणे आवश्यक. इलेक्ट्रॉनिक्स शिकण्याची व हाताने काम करण्याची इच्छा.
- एकूण ३६ तासांचा अभ्यासक्रमः शनिवार, रविवार व बुधवार सायं. ४ ते ६ (किंवा पूर्व नियोजित वेळेनुसार).
- स्थळः विज्ञान केंद्र, इलेक्ट्रॉनिक हॉबी सेंटर, C-24 मानसनगरी, शिवाजी चौक, तळेगाव स्टेशन ४१०५०७
- शुल्कः रु. 1800/- : 36 तासांसाठी.
प्रकल्पाची उद्दिष्टे
या अभ्यासक्रमात पुढील गोष्टी शिकवल्या जातील-- इलेक्ट्रॉनिक सर्किट जोडणे, त्याचे परीक्षण करणे आणि त्यातील दोष शोधून काढणे.
- सर्किट मधील घटक व त्यांचे कार्य थोडक्यात समजून घेणे.
- इलेक्ट्रॉनिक्स मधील संकल्पना व्यवहारात वापरणे आणि उपयुक्त वस्तू निर्माण करणे.__
उपलब्ध यंत्रणा व सामग्री
इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणा तयार करण्यासाठी आवश्यक त्या सर्व वस्तू व अवजारे विद्यार्थ्याला उपलब्ध करून दिली जातील. त्या शिवाय सर्किटचे अंतर्गत कार्य समजून देण्यासाठी मल्टिमीटर व ऑसिलोस्कोप यांचा वापर केला जाईल.
विद्यार्थ्यांकडून हे प्रकल्प करून घेतले जातील.
पुढील प्रकल्प विद्यार्थ्यांनी करायचे आहेत. त्याचा घटक भागांचा खर्च त्यांनीच करायचा आहे. तयार केलेले सर्व प्रकल्प विद्यार्थी त्यांच्या बरोबर घेऊन जाऊ शकतात. हे प्रकल्प यशस्वी करणे हे विद्यार्थ्याचे उद्दिष्ट असेल. त्यामुळे या प्रकल्पांचा वापर त्यांना स्वतःसाठी, घरी करता येऊ शकेल. प्रकल्पाच्या वस्तू बनवण्यासाठीचे साहित्य विद्यार्थी स्वतः विकत घेईल त्यामुळे तयार झालेला प्रकल्प विद्यार्थ्याच्याच मालकीचा असेल.
प्रत्येक विद्यार्थ्याला एकूण तीन प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. त्यातील पुढील दोन सक्तीचे आहेतः-- IC 555 वापरून LED माळेचा फ्लॅशर. (घटक भागांचा अंदाजे खर्चः रु. 125/-)
- LDR वापरून सकाळ संध्याकाळी दिवे नियंत्रित करणे. (घटक भागांचा अंदाजे खर्चः रु. 125/-)
- 6 V चा LED वापरलेला इमर्जन्सी लाइट. (रीचार्जेबल बॅटरीसह एकूण खर्च अंदाजेः रु. 650/-)
- मायक्रो कंट्रोलर वापरलेला ३१ मिनिटांपर्यंतचा टायमरः (घटक भागांचा अंदाजे खर्चः रु. 350/-)
- फॅन स्पीड कंट्रोलर (diac-triac based). (घटक भागांचा अंदाजे खर्चः रु. 200/-)
संपर्क
आमच्याशी संपर्क साधाःContact us here:

लेखकः विज्ञानदूत, तारीखः २३ नोव्हेंबर २०२२