विज्ञानदूतचे प्रकाशन
विज्ञान केंद्रातर्फे पूर्वी प्रकाशित केलेल्या विज्ञानदूत या अनियतकालिकातील काही निवडक लेखांचा संग्रह आता छापील स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध आहे.
माहिती आणि मनोरंजनाचा खजिना
या मराठी पुस्तकात
- विनोद
- कोडी आणि त्यांची उत्तरे
- वैज्ञानिकांची चरित्रे
- पर्यावरण विषयक लेख
- आरोग्य
- घरबाग
अशा अनेक सदरांचा समावेश आहे. बहुतेक लेख एका पानाचे असल्यामुळे बालवाचकांना वाचायला सोयीचे आहेत.
पुस्तक विशेष
A4 आकारातील या पुस्तकाची किंमत केवळ रु. १०० ठेवली आहे. पुस्तकाच्या अनेक प्रती विकत घ्या. स्वतः वाचा इतरांना वाचायला द्या.
- कागदावर छापलेले हे पुस्तक वाचायला बॅटरी खर्च होत नाही.
- भरपूर आकृती आणि छायाचित्रे.
- घरातच टेबलावर ठेवले की कुटुंबातील कोणीही व्यक्ती ते केव्हाही वाचू शकते.
- मित्र आणि नातेवाईकांना हे पुस्तक वाढदिवस व इतर शुभकार्य प्रसंगी भेट देता येते.
- शाळा व वाचनालयांना तुमच्या तर्फे हे पुस्तक देणगी दाखल देता येईल.
- हसत खेळत शिक्षण देणारे हे पुस्तक आहे.
वाचकांचा पहिल्या महिन्यातील भरपूर प्रतिसाद पाहता, हे पुस्तक अधिक वाचकांकडे जावे यासाठी पुस्तक वितरणाची जबाबदारी विज्ञान केंद्राचे जुने सदस्य श्री.प्रमोद सोलकर यांनी स्वीकारली आहे. तुम्हाला हे पुस्तक हवे असेल तर त्यांच्याशी या ईमेल पत्त्यावर संपर्क साधा.
तुमची प्रतिक्रिया तुम्ही इमेल ने पुढील पत्त्यावर पाठवू शकता. निवडक प्रतिक्रिया येथे प्रसिद्ध होतील.
लेखकः विज्ञानदूत. तारीखः