vidnyanlekhan_logo

विज्ञान केंद्र

केल्याने होत आहे रे... आधी केलेचि पाहिजे !

विज्ञान केंद्र SCIENCE CENTRE विज्ञान तंत्रज्ञान विषयक जनजागरण करणाऱ्या लोकांचा समुदाय आहे.

Science Centre is run by volunteers who explain and teach the people what scientific attitude is.

नवे पान

विज्ञान केंद्राचे विविध उपक्रम दर रविवारी सादर होत होते. विविध तज्ञांनी केंद्रात येऊन लोकांसमोर माहितीपूर्ण व्याख्याने दिली. मात्र माहिती कडून कृतीकडे जाण्याचे ठरवल्यानंतर हे कार्यक्रम थांबवले आहेत. आता स्वतः केलेले वैज्ञानिक प्रकल्प सादर करायचे असतील तर विज्ञान केंद्राशी संपर्क साधा. एक नवे पान आता सुरू होत आहे...

पाच नवी कोडी

तर्कशुद्ध विचार करण्याच्या पद्धती वापरून कोडी सोडवण्याचा उपक्रम विज्ञान केंद्रात चालू असतो. या उपक्रमात भाग घेण्यासाठी सदस्य कोडी सोडवतात आणि प्रत्यक्ष कार्यक्रमात चर्चा करतात. अशी पाच नवी कोडी वाचा आणि सोडवली तर आम्हाला कळवा पूर्वनियोजन करून एखाद्या रविवारी कोडी सोडवण्याचे सादरीकरण तुम्ही करू शकता.

पूर्वी सोडवलेली कोडी

तर्कविचार उपक्रमात पूर्वी सोडवलेली आणि चर्चा केलेली कोडी वाचकांना इथे वाचायला मिळतील.

माती आणि पाणी

रवींद्र बोटवे यांनी लिहिलेल्या माती आणि पाणी या पुस्तकाचे परीक्षण विज्ञान केंद्राचे हितचिंतक श्री उदय आठल्ये यांनी या लेखात केले आहे.

गणेशमूर्ती आणि प्रदूषण

डॉ. जयंत गाडगीळ हे विज्ञान केंद्राचे हितचिंतक रसायनसास्त्र या विषयातील तज्ञ आहेत. त्यांनी व त्यांचे सहकारी श्री. उदय ओक यांनी प्लास्टर ऑफ पॅरिस या विषयावर संशोधन केले आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस वापरून तयार केलेल्या गणेशमूर्ती प्रदूषणात किती भर घालतात, त्यावर काही उपाय आहे का, आणि हा भावनात्मक प्रश्न कसा सोडवायचा या विषयीची चर्चा गणेशमूर्ती आणि प्रदूषण या लेखात.

मृदा संवर्धन

माती हे आपल्याला अन्न देणारे मुख्य माध्यम आहे. शेतीची, बागेची माती अधिक समृद्ध कशी करता येते, त्याची किती आवश्यकता आहे या विषयी माहिती देणारा डॉ. अविनाश दांडेकर यांचा लेख मृदा संवर्धन.

सायकल आणि पर्यावरण

कितीही आधुनिक वाहने रस्त्यावर आली तरी सायकलीसारखे पर्यावरणपूरक वाहन दुसरे नाही. विज्ञानदूत यांनी लिहिलेल्या मूळ लेखासहित विज्ञान केंद्र सदस्यांनी मांडलेली त्यांची मनोगते सायकल आणि पर्यावरण या लेखात वाचा.

इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पांचे पुस्तक

विज्ञान केंद्राने काही काळा पूर्वी शालेय विद्यार्थ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स प्रशिक्षणाचा स्वतःचा अभ्यासक्रम चालवला होता. त्यासाठी वापरण्यात आलेले पुस्तक इतरांना उपयोगी पडावे म्हणून येथे प्रकाशित केले आहे. या पुस्तकात इलेक्ट्रॉनिक्स अभ्यासक्रमातील प्रकल्पांचे वर्णन व तपशील इंग्रजीत दिला आहे. पुस्तक pdf format मधे आहे. हे पुस्तक तुम्हाला पाहिजे असल्यास आमच्याशी संपर्क साधा. इमेल वरून हे पुस्तक तुम्हाला निःशुल्क पाठवता येईल. इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पांचे पुस्तक

अंकगणिताचा सराव

शाळेत अंकगणिताचा पुरेसा सराव न झाल्यामुळे पुढे अनेकांना गणित अवघड जाते. विज्ञान केंद्राचे हितचिंतक व सदस्य प्रा. उदय ओक यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी अंकगणिताचा सराव ही संगणकीय प्रणाली लिहिली आहे. ती छापील रूपात व संगणकीय रूपात वापरायची असेल तर त्यासंबंधी माहिती या लेखात वाचा.

संगणकीय अवजारः Midnight Commander

विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर अगदी कमी वेळा इंग्रजीत लेखन केले जाते. असा अपवाद म्हणूनच हा लेख लिहिला आहे. लिनक्स वापरताना प्रोग्रामिंग करायचे असेल तर त्यासाठी अत्यंत शक्तिशाली अवजार असणाऱ्या Midnight Commander या प्रणालीचे वर्णन व विवेचन या लेखात इंग्रजीत केले आहे.

नेमेचि येतो मग पावसाळा...

हल्ली दरवर्षी शाळा कॉलेजातून विज्ञान दिन साजरा केला जातो. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीनं काही वैज्ञानिक प्रकल्प करावेत अशी अपेक्षा असते. कामाच्या धकाधकीतून वेळ काढून काही शिक्षक हे काम अंगावर घेतात देखील . काहींना ते न करण्याचा पर्याय नसल्यानं करावंच लागतं. विद्यार्थ्यांची स्थिती देखील फार वेगळी नसते. सब घोडे बारा टके हा नियम अनेक शाळा आपल्या विद्यार्थ्यांसाठी लावतात आणि विज्ञान प्रकल्पाचं लचांड या मुलांच्या मागे लागतं. पुढे वाचा...

विज्ञान सर्वांसाठी

"विज्ञान सर्वांसाठी" या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर जी आठ व्याख्याने दिली ती क्रमाने येथे देत आहे. ती तुम्हाला वाचता येतील आणि माझ्या आवाजात ऐकताही येतील.

रेडिओ नाटिका

"सौम्या आणि मामा" या माझ्या चार रेडिओ नाटिका रेडिओ इन्फिनिटी च्या कलाकारांनी त्यांच्या रेडिओ केंद्रावरून सादर केल्या. त्या तुम्हाला येथे ऐकता येतील.

गर्दीच्या शोधात लेखक...

लुइगी पिरँडेलो या इटालियन नाटककाराचे Six Characters in Search of An Author हे नाटक जगविख्यात आहे. आज आपल्याला काही सांगायचे आहे पण ऐकणारे कोणी आहे का, या शोधात अनेक स्वयंस्फूर्त लेखक लिहीत आहेत. पण त्यांचे लिहिण्याचे इंटरनेटवरील ठिकाण काय असावे याची चर्चा करणारा हा लेख गर्दीच्या शोधात लेखक...

ऐसी अक्षरे

या लेखाचे शीर्षक पाहूनच, हा लेख चुकून विज्ञान विभागात आला असावा अशी वाचकांना शंका येऊ शकेल. पण तसे काही नाही. अक्षरे केवळ पुस्तक-वह्यांत महत्वाची असतात असे नाही. ती इंटरनेटवरही महत्वाची असतात हे आज वेगळे सांगावे लागेल. नव्या पिढीला तर नक्कीच. कारण वाचण्यापेक्षा ऐकणे आणि चित्रे व चित्रफिती पहाणे हेच आज करमणूक, माहिती आणि ज्ञान संपादनाचे साधन जनसामान्यांनी केले आहे. आमच्या पिढीला ऑडिओ आणि व्हिडिओच आवडतात असं ठरवून तरुणाईने तर हे तारुण्याचे लक्षणच आहे असा गैरसमज करून घेतला आहे. ऐसी अक्षरे या लेखात अक्षरे आणि मीडिआ यांची तुलना केली आहे. वाचकांचा प्रतिसाद देखील अंतर्भूत केला आहे.

simple-model for cylindrical coordinate system

क्वचित इंग्रजी मधून लिहिण्याची परंपरा चालू ठेवणारा गणितातली एक संकल्पना विषद करणारा लेख एक साधे सोपे गणिती मॉडेल.

जुन्याचे सोने !

तोक्यो इथे २०२० साली होऊ न शकलेल्या olympic स्पर्धा या वर्षी होणार आहेत. या वर्षीच्या स्पर्धांची दोन वैशिष्ट्ये आहेत. या स्पर्धा प्रेक्षकांविना होतील. या वर्षी जी पदके देण्यात येणार आहेत, ती ही वेगळीच असतील. या स्पर्धेत विजेत्यांना दिली जाणारी पदके पुनर्चक्रीकरण (recycle) केलेली असतील. पुढे वाचा...

प्लास्टिकचे रूपांतर

प्लास्टिक हा आपला शत्रू आहे ही गोष्ट पूर्णपणे खरी नाही. योग्य प्रकारे प्लास्टिकचे रूपांतरण केले तर प्रदूषणकारी प्लास्टिकवर खूपच नियंत्रण ठेवता येईल. पुण्यात डॉ. जयंत गाडगीळ व उदय ओक या संशोधकांनी प्लास्टिकचे रूपांतर वंगण, मेण व इतर काही उपयुक्त रसायने यांच्यात करण्यात यश मिळवले आहे. याची माहिती मिळवायला प्लास्टिकचे रूपांतर हा लेख वाचा.

विज्ञान गीत

विज्ञान केंद्राला स्वतःचे ध्येयगीत आहे. केंद्र सदस्य आणि हितचिंतकांनी तयार केलेले, विज्ञानदूत लिखित गीत तुम्ही येथे ऐकू शकता... विज्ञान गीत.

घर तेथे भाजीबाग

घर तेथे भाजीबाग हा विज्ञान केंद्राने हाती घेतलेला महत्वाचा प्रकल्प आहे. घर कितीही लहान असो वा मोठे, प्रत्येकाला आपल्या घरी भाजी लावता येते. घराभोवती भाजी लावणे हा खरे तर पूर्वापार चालत आलेला प्रघात आहे. जेव्हा शहरांची बेसुमार वाढ झाली, तेव्हा शहरातल्या घराभोवतीची जमीन कमी झाली. घरातल्या माणसांना पैसा मिळवण्याच्या कामासाठी घराबाहेर जास्त वेळ देणे गरजेचे होऊ लागले. पुढे पुढे तर मातीत हात घालणे हे कमीपणाचे समजले जाऊ लागले. मात्र स्वच्छ, ताजा भाजीपाला मिळवण्यासाठी घरबाग हवीच.

ताजे यशस्वी प्रकल्प

विज्ञान केंद्र सदस्य विविध प्रयोग करत असतात. त्यापैकी यशस्वी झालेल्या प्रयोगांचे रूपांतर सर्वांना उपयोगी पडतील अशा उत्पादनांत केले जाते. हे रूपांतर करण्याचे प्रकल्प मुक्त असतात. असे दोन प्रकल्प नव्याने मुक्त करण्यात आम्हाला सानंद अभिमान वाटत आहे. हे दोन प्रकल्प आहेतः.

विज्ञानदूत या अनियतकालिकाचे प्रकाशन

४ जानेवारी २२ रोजी विज्ञानदूत या अनियतकालिकाचे प्रकाशन केले गेले. हा तो अंक...

एक वेगळी वेबसाइट

एका वेगळ्या वेबसाइटची ही ओळख आहे. सारे जग बलाढ्य जागतिक कंपन्यांनी बनवलेल्या जादूसमान वाटणाऱ्या उत्पादनांनी झपाटले गेले असताना, हा एकांडा शिलेदार आपल्या अत्यंत साध्या दिसणाऱ्या पण प्रभावी प्रकल्प सादर करणाऱ्या वेबसाइटवर आपल्या साऱ्यांना एक इशारा देत आहे. एक वेगळी वेबसाइट...

विजेचा धक्का

विजेचा धक्का (electric shock)हा अनुभव आपण कधीतरी घेतलेला असतोच. त्या बद्दल मनात भीती देखील असते. योग्य काळजी घेतली तर हा धोका टाळता येतो हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. पण विजेचा धक्का का आणि कसा बसतो या बद्दल माहिती फारच कमी जणांना असते. विजेच्या धक्क्याबद्दल वाचा...

कोनाचे मापन

आपण चौथी पाचवीतच कोन ही भूमितीतली कल्पना शिकतो. त्यावेळी काटकोन ९० अंशांचा आणि पूर्ण वर्तुळ हे ३६० अंशांचे ही गोष्ट आपल्याला सांगितली जाते. काटकोन ९० अंशाचाच का असतो, १०० अंशांचा का नाही ? हा प्रश्न अनेकांना चमत्कारिक वाटेल. दशमान पद्धत अवलंबल्यामुळे आपण खरं तर काटकोन १०० अंशांचा असं मानलं तर काही गोष्टी अधिक सुलभ होतील. काटकोन ९० अंशांचाच का असतो याला कोणतंही तर्कशुद्ध-गणिती उत्तर नाही. कोनाच्या मापनाबद्दल वाचा...

विज्ञानदूत एप्रिल २१

विज्ञानदूत या विज्ञान केंद्राच्या अनियतकालिकाचा या वर्षातला हा तिसरा अंक. या अंकाचे मानकरी आहेत श्री. उदय ओक, डॉ.जयंत गाडगीळ आणि विज्ञानदूत. विज्ञानदूत एप्रिल २१ चा अंक येथे वाचा...

विज्ञानदूत मार्च २१

विज्ञानदूत या विज्ञान केंद्राच्या अनियतकालिकाचा या वर्षातला हा दुसरा अंक. शास्त्रीय माहिती आणि मनोरंजन यांचा खजिना असणारा विज्ञानदूत मार्च २१ चा अंक येथे वाचा...

विज्ञानदूत फेब्रुवारी २१

विज्ञानदूत हे विज्ञान केंद्राचे अनियतकालिक १० महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा प्रकाशित होत आहे. माहिती आणि मनोरंजनाचा खजिना वाचा...

पृथ्वीवरील सजीवांचे भयावह भवितव्य

पृथ्वीवरील जीवसृष्टीला व पर्यायाने मानवाला, चिरकाल व चांगले जगता यावे यासाठी काही कृती मुद्दाम ठरवून व प्रयत्नपूर्वक करायला लागणार आहेत ही कल्पनाच अनेकांना नाही. माणसाचे आरोग्य, संपत्ती आणि एकूणच आयुष्य अधिकच तणावग्रस्त होत आहे. त्यामुळे या परिस्थितीत चांगला बदल करण्याची आपली क्षमता कमी होते आहे. हे बदल करण्यासाठी लागणारी वैज्ञानिक शक्ती आपल्याकडे आहे पण वस्तुस्थितीची जाणीव मात्र नाही. त्यामुळे हा समाज अगदी सामान्य पण चांगले बदल करण्यातही अपयशी ठरत आला आहे. सध्यस्थितीवर परखड भाष्य करणारा हा लेख वाचा...

सुमारे १५० जुने लेख

विज्ञान केंद्राचे उपक्रम गेली २५ वर्षे चालू आहेत. या अवधीत पूर्वी प्रसिद्ध केलेले लेख, उपक्रम अहवाल वगैरे जुन्या संकेतस्थळावर वाचता येतील.

संपर्क

आमच्याशी संपर्क साधायचा आहे ? मग इथे क्लिक करा !