“माय माती” – शेती विषयक पुस्तक

काही दिवसांपूर्वी माझे मित्र विज्ञानदूत यांनी श्री. रविंद्र बोटवे लिखित “माय माती” हे पुस्तक भेट दिले. पुस्तक वाचल्यानंतर माझी मते संक्षिप्त स्वरूपात नमूद करीत आहे.

हे पुस्तक शेतकरी बंधूंनी, शेती विषयी आस्था असलेल्या व्यक्तींनी वाचनीय आहे. अतिशय सोप्या भाषेत, कुठलेही पाल्हाळ न लावता माती विषयी सखोल माहिती लेखकाने पुरवली आहे. अनुक्रमणिकेतूनच मातीविषयाच्या सुसंगत लेखनरचनेचा अंदाज येतो. प्रत्येक प्रकरणात विषयाची आस्था, कळकळ जाणवते.

माती म्हणजे काय ? इथून सुरुवात करून मातीचा रंग, पोत, त्यातील घटवगैरे बऱ्याच गोष्टींचा परामर्श घेण्यात लेखक यशस्वी झाला आहे असे माझे मत आहे. परंतु शिक्षणाचा अभाव, जिज्ञासा नसणे, शेती विषयक कामे व इतर सांसारिक समस्येमुळे किती शेतकरी हे पुस्तक वाचतील या विषयी मला शंका आहे. शेतीविषयक सामग्री पुरवणाऱ्या कंपन्या, व्यापारी हे शेतकऱ्यांना स्वतःला फायदेशीर माहिती  पुरवतात व बहुसंख्य शेतकरी त्यांच्या बोलण्याला, आमिषाला बळी पडत असावेत असे मला वाटते. अर्थात लेखकाने पुस्तकात बऱ्याच वेळा याचा उल्लेख केला आहेच.

मी शेतकरी नाही, पण एक शेतीप्रेमी म्हणून सुद्धा मला “माय माती” हे पुस्तक खूप आवडले. माझे माती विषयी ज्ञान वाढले असेही म्हणता येईल. शक्य तितक्या शेतकऱ्यांना भेटून सदर पुस्तक वाचायला द्यायला मी प्रयत्नशील राहीन.

चांगले पुस्तक लिहिल्या बद्दल श्री. रविंद्र बोटवे यांचे अभिनंदन.

हे पुस्तक शेतकरी, शेतीप्रेमी यांनी जरूर विकत घेऊन वाचावे, वाटावे. ते विकत घेण्यासाठी लेखकाशी या इमेल पत्त्यावर संपर्क करता येईल –

 

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Leave a comment

गणेश मूर्ती व प्रदूषण

गेली काही वर्षे गणपती उत्सव जवळ आला की ज्या विषयांवर वाद-विवाद सुरू होतात त्यात ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती, त्यांच्या विसर्जनामुळे होणारे प्रदूषण, त्या मूर्तींवर बंदी आणण्याची मागणी, ‘पर्यावरणपूरक’ मूर्ती असे बरेच काही हिरीरीने मांडले जाते. या विषयाबद्दल थोडी सविस्तर मांडणी करणे हा या लेखाचा उद्देश. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या कचरा व्यवस्थापनासाठी केलेल्या संशोधनात मी सहभागी होतो. त्यात आलेले अनुभव व माहिती मी येथे मांडत आहे. Continue reading

Posted in लेखन संवाद मंडळ | Tagged , , | 3 Comments

मृदा संवर्धन

भारतातील एक मोठे क्षेत्र शेतीखाली आहे. लोकसंख्येतील मोठा भाग उपजीविकेसाठी शेतीवर अवलंबून आहे. आपली माती ही आपल्या अन्नप्रणालीचा पाया आहे,ती आपली शेती,  जंगले आणि जैवविविधतेला आधार देते आणि हवामान बदल कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

Continue reading

Posted in लेखन संवाद मंडळ | Tagged , , | 2 Comments

सायकल आणि पर्यावरण

सायकल चालक हा पर्यावरणाचे रक्षण करतो अशी आजवरची आपली समजूत होती. सुदैवाने ती आज देखील खरी आहे. पण हे फार दिवस खरे ठरेल असे नाही. नव्या सायकलींचे (प्रचंड प्रमाणात) उत्पादन ज्या प्रकारे होते आहे, त्या प्रकारे उत्पादन व विक्री होत असतानाच या सायकली पर्यावरणावर आघात करीत आहेत हे लक्षात येते.

Continue reading

Posted in लेखन संवाद मंडळ | 6 Comments

इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पांचे पुस्तक

काही महिन्यांपूर्वी विज्ञान केंद्राच्या वतीने इलेक्ट्रॉनिक्स हॉबी सेंटर चालू झाले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. सध्या ५ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना उपयोगी पडेल असे पाच प्रकल्पांचे पुस्तक लिहिले आहे. ते आज संकेतस्थळावर प्रकाशित करत आहे.

Continue reading

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Leave a comment

सौम्या आणि मामा-४

“विज्ञान सर्वांसाठी” या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर आठ व्याख्याने दिली. त्यानंतर माझ्या चार लघुनाटिका तेथून प्रसारित झाल्या. ही चौथी लघुनाटिका.

Continue reading

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Leave a comment

सौम्या आणि मामा-३

“विज्ञान सर्वांसाठी” या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर आठ व्याख्याने दिली. त्यानंतर माझ्या चार लघुनाटिका तेथून प्रसारित झाल्या. ही तिसरी लघुनाटिका.

Continue reading

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Leave a comment

सौम्या आणि मामा-२

“विज्ञान सर्वांसाठी” या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर आठ व्याख्याने दिली. त्यानंतर माझ्या चार लघुनाटिका तेथून प्रसारित झाल्या. ही दुसरी लघुनाटिका.

Continue reading

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Leave a comment

सौम्या आणि मामा-१

“विज्ञान सर्वांसाठी” या विषयावर मी काही काळापूर्वी रेडिओ इन्फिनिटी या कम्युनिटी रेडिओवर आठ व्याख्याने दिली. त्यानंतर माझ्या चार लघुनाटिका तेथून प्रसारित झाल्या. ही पहिली लघुनाटिका. Continue reading

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | 3 Comments

अंकगणिताचा सराव

बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लसावि-मसावि हा अंकगणिताचा पाया. पुढली कुठलीही उदाहरणे समजवून घेण्यासाठी आणि सोडवण्यासाठी हा पाया पक्का असणे गरजेचे आहे. हा पाया पक्का करण्यासाठी विज्ञान केंद्राचे हितचिंतक प्रा. उदय ओक यांनी काही प्रश्नसंच तयार केले आहेत. Continue reading

Posted in विज्ञान तंत्रज्ञान | Leave a comment