विज्ञान केंद्र सातत्याने मुक्त संगणक प्रणालींचा प्रसार करते. केंद्राच्या सर्व प्रकल्पांमधे केवळ मुक्त प्रणालीच वापरल्या जातात. सर्वांनी मुक्त संगणक प्रणाली वापराव्यात या साठी एक (निःशुल्क) शिबीर भारतीय फ्री सॉफ्टवेअर फौंडेशनने आयोजित केले आहे. त्या बद्दल ही माहिती व तपशील.
मुक्त सॉफ्टवेअर शिबीर हे फ्री साॅफ्टवेअर फाऊंडेशन ऑफ इंडिया (भारतीय मुक्त सॉफ्टवेअर संस्था) आणि फ्री साॅफ्टवेअर कम्युनिटी ऑफ इंडिया (भारतीय मुक्त सॉफ्टवेअर समुदाय) यांनी संयुक्तपणे आयोजन केलेले ‘मुक्त सॉफ्टवेअर’ विषयावरील ऑनलाईन मार्गदर्शन शिबीर आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये याची सुरुवात होऊन ते फेब्रुवारी २०२१ च्या शेवटी संपेल.
संगणक सूचनावली लेखन (programming), संगणक व्यवस्थापन (system administration), पॅकेजिंग, UI/UX, सॉफ्टवेअर गुन्हे अन्वेषण (forensics), विविध भाषेत उपलब्धीकरण (localization), कलाकृती, दस्तऐवजीकरण (documentation), प्रसिद्धी, कार्यक्रम आयोजन, इत्यादी प्रकारच्या योगदानाचं शिबिरातर्फे स्वागतच आहे, फक्त सर्व योगदाने ही मुक्त सॉफ्टवेअरच्या तत्वप्रणालीशी सुसंगत असावी. Big Blue Button, Matrix इत्यादी ऑनलाईन मुक्त सॉफ्टवेअर संपर्क साधनांचा वापर करून शिबीर घेण्यात येईल. सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही.
या शिबिराचा तपशील येथे पाहता येईल.