हवामानावरील संकट -३

मागील दोन लेखांकांत आपण हवामानावरील संकटाचे गांभिर्य आणि प्रसारमाध्यमांनी या विषयाला दिलेले क्षुल्लक महत्व यावर विचार केला. यावेळी काही निष्कर्ष पहाणार आहोत.

अंतिम निष्कर्ष

राजकीय आणि आर्थिक क्षेत्रावर हवामान बदलामुळे जे परिणाम होणार आहेत, ते टाळण्यासाठी तातडीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे. खाजगी नियंत्रणाखाली असलेली प्रसारमाध्यमे आणि त्यांचेच ऐकणारे सरकार कधीही हवामानातील बिघाडा संबंधी उत्तरे देऊ शकत नाही. ‘ The Media Manifesto ‘ असा युक्तीवाद करतातः आम्हाला जबाबदार, जनहिताची कामे करणारी प्रसारमाध्यमे हवी आहेत. जी खरोखरच लोकशाहीवादी, वैविध्यपूर्ण आणि या कामातले सातत्य टिकवणारी असतील.

Black Lives Matter आणि Extintion Rebellion सारख्या चळवळी समान उद्दिष्टे ठेवल्या शिवाय यशस्वी होणार नाहीत. खाजगी प्रसारमाध्यमे बंद करणे गरजेचे आहे, कारण ती  भांडवलशाहीच्या प्रचाराची एक शाखा आहे. अशा माध्यमांची जागा जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या वृत्तसंस्थांनी घ्यायला हवी.

आपण हे स्पष्ट सांगितले पाहिजे की, सार्मथ्यशाली व्यक्तीला सामान्य माणूस अहिंसकपणे थेट आव्हान देऊ शकतो, पण स्पष्ट उद्दिष्टांच्या आधारावरच. शिवाय हे आव्हान सार्मथ्यपूर्ण, सतत असे  शहाणपणाचे असायला हवे. हवामान बदलामुळे होणाऱ्या बदलांबद्दल नम्रपणे विचारणे गरजेचे आहे. तात्पुरत्या तकलादू तडजोडी हवामान बदलाच्या गंभीरतेमुळे परिणामकारक ठरणार नाहीत. महत्वपूर्ण सुधारणेसाठी सामूहिक चळवळ सुरू केली पाहिजे,  जी सार्मथ्यशाली लोकांना आव्हान देऊ शकेल.

सार्मथ्यशाली लोकांना शक्तीची सतत गरज भासते. मुळात ही शक्ति आपल्याकडून काढून घेतली गेलेली आहे. मानवी जीवन सुरक्षित करण्यासाठी ती शक्ति त्यांच्याकडून शांतपणे हिसकावून घ्यायला हवी.

-ओंकार देसाई

ही लेखमाला या लेखावर आधारित आहे. त्यामुळे अनेक उदाहरणे परदेशांतील आहेत. पण आपल्या देशातली परिस्थिती वेगळी नाही हे चतुर वाचकांच्या लक्षात येईलच.

This entry was posted in विज्ञान तंत्रज्ञान and tagged , . Bookmark the permalink.