हवामानावरील संकट -२

मागच्या लेखांकात हवामानावरील संकट किती गंभीर आहे हे आपण पाहिले. या लेखांकात या संदर्भातली प्रसारमाध्यमांची भूमिका आणि वस्तुस्थिती पाहूया.

प्रसारमाध्यमांची कार्यपध्दती हेच त्यांचे अपयश

वर्तमान पत्रांमधे विज्ञान आणि पर्यावरण या भागात हवामाना बदलाबद्दलचे बरेच नवीन आणि नाट्यमय शोध नोंदवले जातात. पण बातम्यांमधे मात्र समाजात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या अशा घटनांना स्पष्टपणे स्पर्श केला जातो असे दिसत नाही.

विशेषतः हवामान कोसळण्याच्या धोक्याचा क्वचितच राजकारण, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेसाठी राखीव असलेल्या पानांमधे उल्लेख होतो.  ह्या पानांचे वैशिष्ट्य असे आहे की, त्यांवर पत्रकार, स्तंभलेखक, भाष्यकार हे सारे पूर्णपणे निष्प्रभ झालेले दिसतात.  चालू घडामोडींवर जे प्रश्न विचारत नाहीत अशा पत्रकारांना पुढे आणले जाते. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, प्रसारमाध्यमे राष्ट्रप्रमुख व जुन्या राजकारण्यांना हवामान बदला बद्दल कधीही प्रश्न विचारत नाहीत.

पूर्वी Corporate Watch मधे काम करणाऱ्या पत्रकार रिबेका फिशर यांनी काही काळापुर्वी एक नोंद केली :

UK ची आताची लोकशाही नागरिकांना संरक्षण देत नाही. तसेच अनियंत्रित आर्थिक वाढ व राज्य कसे चालवले जाते या विषयी नागरिकांना प्रत्यक्षपणे माहिती देत नाहीत.

प्रसारमाध्यमांची मालकी मूठभर लोकांकडे असणे हा खरा महत्वाचा विषय आहे.  शहाण्या लोकांनी लोकशाही राजकारणात सहभागी होण्यातला  मुख्य अडथळा हाच आहे.

२०१९ मधे Media Reform Coallition ने UK मधील माध्यमांची मालकी ह्यावर एक अहवाल सादर केला. त्यातून असे समोर आले की २०१५ च्या तुलनेत ह्या वर्षी परिस्थिती आणखी बिकट आहे.  वृत्तपत्रांच्या बाजारपेठे मधे ८३% वर्चस्व तीन आस्थापनांचे आहे.

  1.  Rupert Murdoch’s News UK
  2. Daily Mail Group
  3. Reach.

या अहवालाचे लेखक असे सूचित करतातः आम्हाला असे वाटते की UK मधे प्रसारमाध्यमांच्या बाजारपेठेची मालकी एका विशिष्ट गटाकडे गेली आहे. एका ठिकाणी एकटवलेल्या मालकीमुळे श्रीमंत व्यक्ती आणि आस्थापने आर्थिक व राजकीय ताकद मिळवतात. स्वतः चा फायदा करून घेण्यासाठी माध्यमांना विकृत बनवतात.

जेस फ्रिडमन म्हणतात:  स्वतःची स्वायत्तता टिकवण्याऐवजी, तसेच लोकहिताची पत्रकारिता करण्याऐवजी BBC शक्तिशाली लोकांच्या धोरणांचीच री ओढते

‘ The Media Manifesto’ या पुस्तकाचे लेखक फेनटोन म्हणतात :

‘ BBC ने आपण निःपक्षपाती आणि स्वतंत्र असल्याचा दावा केला तरी BBC नेहमीच उच्चभ्रूंची बाजू घेते आणि सत्तेत असणाऱ्यांची गुलाम म्हणुन वागते.’

BBC न्यूज, राज्य आणि काॅर्पोरेट्स मधील हितसंबंधांचा प्रचार करण्याचे केंद्र म्हणून काम करत असल्याचे अनेक पुरावे आहेत. आधुनिक भांडवलवाद, नव-उदार (neo-liberal) बाजारपेठा आणि नव-उदार राज्ये यांच्या हितसंबंधांवर BBC अवलंबून आहे.

प्रसारमाध्यमांनी  हवामान बदलांचे दुष्परिणाम योग्य प्रकारे लोकांसमोर आणणे आणि सर्व प्रकारची असमानता कमी करण्यास मदत करणे ह्या गोष्टी केल्या तरच विध्वंसक विकास थोपवता येईल. 

-ओंकार देसाई

वरील लेखांक या लेखावर आधारित आहे.

 

This entry was posted in विज्ञान तंत्रज्ञान and tagged . Bookmark the permalink.