हवामानावरील संकट -१

आयझॅक असिमोवने त्याची विज्ञान  कादंबरी ‘Foundation’ मधे मनुष्य-समूहाच्या भवितव्याचा आधीच अंदाज घेता येतो असे मांडले आहे. त्यासाठी जुना इतिहास, समुदायाची मानसिकता, आणि  त्यामागील गणित ह्यांचा एकत्रितपणे अभ्यास करावा लागतो. त्यानुसार,  होणाऱ्या परिणामांचे भकित मनोवैज्ञानिक करू शकतात. कादंबरीतील युगकर्ता नायक  ‘Harry Seldon’  १२००० वर्षे टिकलेल्या गॅलॅक्टिक साम्राज्याला असे सांगतो की पुढील ५०० वर्षांत हे साम्राज्य नष्ट होईल. त्याच्या ह्या सांगण्यामुळे त्याला दुसऱ्या ग्रहावर हलवण्यात येते.

आजच्या जगात, मानवी संस्कृतीच्या संभाव्यतेबद्दल, खरंच अंधुक दिसत आहे. आघाडीच्या हवामान आणि जीव शास्त्रज्ञांच्या मते मानवजात नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ते असा इशारा देतात की आता काही बदल करायचा असेल तर फार उशीर झाला आहे.

प्रसार माध्यमांकडून दुर्लक्ष

शास्त्रीय पुरावे आणि तर्कसंगत केलेली चर्चा यावर आधारीत असे हे तज्ञांनी काढलेले निष्कर्ष आहेत. अशा निष्कर्षांकडे नेहमीच मुख्य प्रसारमाध्यमांकडून दुर्लक्ष केले जाते.

मागच्या नोव्हेंबर मधे नेचर या नियतकालिकामधे एक अभ्यास हवामान शास्त्रज्ञांकडून प्रदर्शित करण्यात आला. त्यामधे त्यांनी जागतिक हवामानाच्या स्थिरतेचे नियमन करणाऱ्या नऊ कलंडणाऱ्या बिंदूंचा (tipping points) त्यात समावेश केला.  त्या नऊ कलंडणाऱ्या बिंदूंमधे (tipping points)  खालील बिंदूंचा सुद्धा समावेश आहेः

  1. उत्तर अटलांटिक महासागरातील समुद्रीय प्रवाहांचा वेग बदलणे
  2. अमेझाॅनच्या जंगलाची जंगलतोड
  3. पश्चिम अंटार्टिकमधील बर्फ वितळणे.

कलंडणाऱ्या बिंदुंपैकी एका बिंदुंने जरी त्याची सीमारेषा ओलांडली तर पृथ्वीच्या हवामान मोठ्याप्रमाणात बिघडेल आणि जागतिक तापमानवाढीत भर पडेल. 

शिक्षण व संशोधन क्षेत्रातली सभ्य आणि सामोपचाराची भाषा वापरण्याची प्रथा लक्षात घेता ‘नेचर’ या नियतकालिकामधे इशाऱ्याची काही विधाने दिली आहेत ती फारच कठोर वाटतात. याचा अर्थ आता सौम्य इशारे देऊन उपयोग होणार नाही असे संशोधकांना वाटत असावे. 

अचानक आणि अपरिवर्तनीय हवामान बदलांमुळे ऊर्जा उत्सजर्नावर नियंत्रण करणाऱ्या, राजकीय व आर्थिक कृती करण्यासाठी भर द्यायला हवा.’

शास्त्रज्ञांचे असे म्हणणे आहे की :

आता आपण हवामानाच्या दृष्टीने आणीबाणीच्या परिस्थितीत आहोत त्यामुळे ह्या वर्षी हवामान-बदलाच्या विरोधात कृती करायला हवी. शाळेतली मुले , वैज्ञानिक, शहरे आणि देश ह्यानी एकत्र येऊन ही कृती बळकट करायला हवी.’

थोडक्यात सांगायचे झाल्यास मानवी संस्कृतीचे अस्तित्व धोक्यात आहे आणि आपल्याला केवळ नफा तोट्याचे ताळेबंद व त्यांचे विश्लेषण उपयोगी पडणार नाही. 

एका अभ्यासाचे सहलेखक ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे हवामान आणि भूशास्त्राचे प्राध्यापक विल स्टेफन म्हणाले की, ऑस्ट्रेलियन प्रशासनाने एक प्रश्न उपस्थित केला तो असा: आपण व्यवस्थेवरचे नियंत्रण गमावले आहे का? ती कोसळणे आता अपरिहार्य आहे का ?

आपले टायटॅनिक होणार ?

दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, आपल्याकडे आता पर्यावरण स्थिर ठेवणाऱ्या गोष्टींचा ऱ्हास थांबवण्यासाठी पुरेसा वेळ नाही. त्यांनी एक उदाहरण दिले ते असे, ‘ जर टायटॅनिकच्या कप्तानाला ५ कि.मी. वर असताना आपण संकटात आहोत हे कळले असते तर त्याने जहाजाचा वेग कमी केला असता व वळवले असते. पण जहाज हिमनगापासुन ३ कि.मी. होते, त्यामुळे जे झाले तेच  नशीबात होते. 

यु.के. च्या राष्ट्रीय वृतपत्रामधे वरील त्रासदायक उदाहरणाचा उल्लेख प्रसिध्द हवामान शास्त्रज्ञ स्टेफन यांनी केला. ते म्हणतात, “आम्ही त्या उदाहरणाचे समर्थन करणाऱ्या माध्यमांच्या डेटाबेसचा शोध घेतला. आम्हाला डेली एक्सप्रेस या वृतपत्रामधे एक छोटा लेख मिळाला. पृथ्वीच्या हवामानाची पडझड होत आहे ह्या कडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, पण मुख्य प्रसारमाध्यमां मधे (दुर्लक्ष करण्याची) विकृती कशामुळे निर्माण झाली हे समजू शकेल ?” कारण मुख्य प्रसारमाध्यमे या गंभीर विषयाकडे लक्षच देत नाहीत.

शास्त्रज्ञ आपल्याला काही काळापासुन असा इशारा देत आहेत की आपण पृथ्वीच्या (सहाव्या) सामूहिकरित्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहोत. पण ह्या वेळेस नैसर्गिक आपत्तीने नामशेष होणार नाही, तर आपण आपल्या मानवी कृत्यां  मुळेच  नामशेष होऊ. अत्यंत दुःखद बाब म्हणजे जीवशास्त्रज्ञांना अभ्यासाअंती मिळालेल्या पुराव्यांनुसार जगात प्राण्यांच्या आणि पक्षांच्या प्रजातींचा मोठ्याप्रमाणात ऱ्हास होत आहे. २०१७ मधे ‘ Proceedings Of The National Acadamy Of Sciences’ मधे एक अभ्यास प्रदर्शित करण्यात आला. त्यात असे दिले होते , कोट्यवधी प्राणी व पक्षी नष्ट झाले आहेत, ह्याला जैविक उच्चाटन असे म्हणतात. ते म्हणतात की पूर्वीच्या निरीक्षणांपेक्षा ही निरीक्षणे अधिक घातक आहेत. म्हणजे माणसाच्या चंगळवादी कृतींनी एकूणच सजीव सृष्टीला धोका उत्पन्न झाला आहे. 

मागील महिन्यात एक अभ्यास प्रदर्शित झाला. त्यात असे दिले होते, जमिनीवरील प्राणी ह्या दोन दशकात मोठ्याप्रमाणात नामशेष झाले आहेत. मेक्सिकोच्या ‘National Autonomus University’ चे पर्यावरणशास्त्रज्ञ व ह्या अभ्यासाचे मुख्य अभ्यासक गेरारडो सेबॅलोस म्हणाले,

आपण जिवंत व चैनीत रहावे म्हणून आपण ह्या ग्रहाच्या सगळ्या क्षमता ओरबाडत आहोत.’

तरी देखील माणूस, प्राण्यांच्या आणि पक्षांच्या प्रजाती तसेच नैसर्गिक अधिवास नष्ट करणाच्या मागे लागला आहे. सेबॅलोस व त्यांचे सहकारी असा इशारा देतात की ‘ ही दूरगामी भयानक परिणामांची मालिका आहे’. ह्यात कोविड-१९ सारख्या नवीन आजारांचा तसेच साथीच्या रोगांचा समावेश होतो.’

“आपण हे समजून घेतले पाहिजे की येणाऱ्या ५ ते १० वर्षांत आपण जे काही करणार आहोत ते मानवी संस्कृतीचे भविष्य ठरवणार आहे.”

पण उपाय करण्यासाठी हा वेळ फार कमी  पडेल. 

International Energy Agency चे कार्यकारी संचालक फेथ बिरोल यांच्या मते हवामानावरील संकट टाळण्यासाठी आपल्याकडे सहा महिने आहेत.  मेलबर्न युनिर्व्हसिटीचे वक्ते व संशोधक सॅम्युअल अलेक्झांडर म्हणतात, संघटित मानवी संस्कृतीचा अंत ही एक काल्पनिक घटना नाही. आपण आता अशा एका टप्प्यावर पोहोचत आहोत

जर आपण बऱ्याच दशकांपासून उभ्या ठाकलेल्या संकटाना तोंड देत, विद्यमान मानवी संस्कृती जपली,  जर शासन आणि समाज घातक गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न करत राहिले,  आणि सुधारलेल्या गोष्टी काही काळासाठी चालू ठेवल्या तरच परिस्थिती सुधारते.”

त्यांनी ह्यात अजुन एक मुद्दा मांडला:

भांडवलशाही चे पाईक  नियमांना चकमा देण्यात नेहमीच पटाईत असतात आणि कायदेशीरपणे आव्हानातून नेहमीच निसटतात. पण सध्याची ही परिस्थिती अगदी टोकाची आहे.”

स्टिफन यांना असे वाटते, Black Lives Matter आणि Extinction Rebellion या सारख्या चळवळी थांबणार नाहीत.  त्या चळवळींमुळे अस्थिरता मात्र वाढत आहे. सॅम्युअल आलेक्झांडर म्हणतात , ‘ एका बंदिस्त प्रणाली मधे वाफ तयार होण्याचे हे लक्षण आहे.’ मोठ्या प्रमाणात मूलभूत परिणाम घडवणणारी कृती न केल्याने आणि सरकारी धोरणांमधे बदल न केल्याने परिस्थिती बिघडत आहे. त्यामुळे नागरी शांततेचा स्फोट होण्याची शक्यता आहे. त्यांनी आशा व्यक्त केली की , ‘ जर पुरेसा सार्वजनिक दबाव असेल तर भविष्यात थोड्याच प्रमाणात भांडवलशाही व औद्योगिकरण टिकेल.

ऑस्ट्रेलियन सरकारचे माजी वैज्ञानिक ग्रॅहॅम टर्नर सांगतात, मला वाटते की आपण सर्वांनी साधे व निर्विवादपणे परिपूर्ण जीवन जगायचे ठरवले तर आपण समुचित तंत्रज्ञानाच्या वापराने शाश्वत जीवन जगू शकतो. पण सध्याची परिस्थिती पहाता, आपण अशा दिशेने वाटचाल  करत आहोत ज्यामुळे सारे जग नष्ट होऊ शकते.’

त्यांनी अशी भीती व्यक्त केली की, लोक जेव्हा त्यांच्या नोकऱ्या गमावतील, किंवा त्यांचे जीव गमावतील किंवा त्यांच्या मुलांना थेट त्रास सहन करावा लागेल, तेव्हा आणि तरच बदलाची मागणी होईल.

दरम्यान, सायबेरीयात सर्व ठिकाणी उष्णतेची लाट दिर्घकाळ सुरु आहे. ह्याचे वर्णन एका हवामान शास्त्रज्ञाने ‘ निःसंशयपणे चिंताजनक ‘ असे केले, २०२० हे वर्ष जागतिक सर्वोच्च उष्ण वर्ष बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

या लेखमालेतील पुढील लेख पुढील आठवड्यात.

-ओंकार देसाई

वरील लेखांक ज्या मूळ लेखावर आधारीत आहे त्याची लिंक :-

https://www.medialens.org/2020/six-months-to-avert-climate-crisis-climate-breakdown-and-the-corporate-media/

This entry was posted in विज्ञान तंत्रज्ञान and tagged , . Bookmark the permalink.