हास्यकेंद्र ४

गणितज्ञांचे प्रकार किती ?

गणितज्ञ तीन प्रकारचे असतात. ज्यांना मोजता येतं असे आणि ज्यांना मोजता येत नाही असे !

रसेल = पोप

रसेल = पोप !

रसेल = पोप !

प्रख्यात गणितज्ञ सर बर्ट्रांड रसेल यांनी एकदा असे म्हटले की 1+1=1 हे एकदा मान्य केले की काहीही सिद्ध करता येते.

एकाने त्यांना असे विचारले तर मग असे सिद्ध करा की तुम्हीच पोप (प्रमुख ख्रिस्ती धर्मगुरू) आहात.” रसेल म्हणाले, “सोपं आहे. मी एकच आहे, पोपही एकच आहेत म्हणून मी पोप आहे !”

गणिताची गोळी

एका प्रगत देशात विविध ज्ञानशाखांच्या गोळ्या तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
एकदा तिथला एक विद्यार्थी औषधांच्या दुकानात गेला. तुमच्या कडे कोणकोणत्या विषयांच्या गोळ्या आहेत हो ?” त्याने विचारले.
दुकानदार म्हणाला ही घ्या, ही इंग्रजी साहित्याची गोळी.” विद्यार्थ्याने ती लगेच गिळून टाकली आणि तो इंग्रजी साहित्याचा पंडित बनला.
आणखी कोणत्या गोळ्या आहेत तुमच्याकडे ?” विद्यार्थ्याने चौकशी केली तेव्हा इतिहास, भूगोल या सारख्या गोळ्या त्याला मिळाल्या. तो त्या त्या विषयातला तज्ञ बनला.
गणिताची गोळी नाही का तुमच्याकडे ?” असे विद्यार्थ्याने विचारल्यावर दुकानदार आत गेला आणि एक मोठ्ठी बरणी घेऊन आला. एकेक गोळी चांगली फुटबॉल एवढी मोठी होती.
अरे बापरे ही गोळी गिळायची कशी ?” विद्यार्थ्याने विचारले.

गणित नेहमीच अवघड जातं, नाही का ?दुकानदाराने प्रश्न केला.

 

This entry was posted in विनोद. Bookmark the permalink.