
तुमच्या स्वयंपाकासाठी गॅस तुम्हीच बनवा ! ही घोषणा आता आम्ही प्रत्यक्षात आणली आहे. जैविक कचरा खाऊन आणि अक्षरशः पचवून त्याचे रूपांतर मिथेन इंधनात करणारे संयंत्र आम्ही नुकतेच आमच्या कडे बसवले. आज साधारण अडीच महिन्यांनंतर, आम्ही आमच्या स्वयंपाक इंधनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण झालो आहोत. १ हजार लिटर ची पाचक टाकी (Digester), मिथेन वायू साठवणारा १००० लिटरचा दणकट […]