Category: पर्यावरण

पर्यावरणीय समस्या आमि त्यांचे समाधान. विविध प्रकल्पांची माहिती.

सजीवांचे भयावह भवितव्य

पृथ्वीवरील जीवसृष्टीला व पर्यायाने मानवाला, चिरकाल व चांगले जगता यावे यासाठी काही कृती मुद्दाम ठरवून व प्रयत्नपूर्वक करायला लागणार आहेत ही कल्पनाच अनेकांना नाही. माणसाचे आरोग्य, संपत्ती आणि एकूणच आयुष्य अधिकच तणावग्रस्त होत आहे. त्यामुळे या परिस्थितीत चांगला बदल करण्याची आपली क्षमता कमी होते आहे. हे बदल करण्यासाठी लागणारी वैज्ञानिक शक्ती आपल्याकडे आहे पण वस्तुस्थितीची […]

घर तेथे भाजी बाग

घर तेथे भाजीबाग हा विज्ञान केंद्राने हाती घेतलेला महत्वाचा प्रकल्प आहे. घर कितीही लहान असो वा मोठे, प्रत्येकाला आपल्या घरी भाजी लावता येते. घराभोवती भाजी लावणे हा खरे तर पूर्वापार चालत आलेला प्रघात आहे. जेव्हा शहरांची बेसुमार वाढ झाली, तेव्हा शहरातल्या घराभोवतीची जमीन कमी झाली. घरातल्या माणसांना पैसा मिळवण्याच्या कामासाठी घराबाहेर जास्त वेळ देणे गरजेचे […]

गतिमान संतुलन

महाराष्ट्रातले नामवंत पर्यावरण कार्यकर्ते श्री. दिलीप कुलकर्णी यांचा गतिमान संतुलन हा अंक विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर वाचनासाठी उपलब्ध करून देण्यास त्यांची संमती आहे. गेले चार अंक करोनामुळे निघाले नाहीत. त्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबरचा अंक जोड अंक आहे. तो व इतर काही जुने अंक वाचकांना येथे डाउनलोड करता येतील.

हवामानावरील संकट -३

मागील दोन लेखांकांत आपण हवामानावरील संकटाचे गांभिर्य आणि प्रसारमाध्यमांनी या विषयाला दिलेले क्षुल्लक महत्व यावर विचार केला. यावेळी काही निष्कर्ष पहाणार आहोत.

हवामानावरील संकट -१

आयझॅक असिमोवने त्याची विज्ञान  कादंबरी ‘Foundation’ मधे मनुष्य-समूहाच्या भवितव्याचा आधीच अंदाज घेता येतो असे मांडले आहे. त्यासाठी जुना इतिहास, समुदायाची मानसिकता, आणि  त्यामागील गणित ह्यांचा एकत्रितपणे अभ्यास करावा लागतो.

हवामान बदल आणि आराेग्य

गेल्या ५० वर्षांपासुन मानवी हालचालींमधे (खरे तर उपदव्यापांमधे) वाढ झाली आहे. विशेषतः जीवाश्म इंधनाच्या(Fossile Fuel) ज्वलनामधे प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कार्बन डायआॅक्साइड(CO2) व इतर हरितगृह वायु(Green House Gases) हवेत साेडले जातात. म्हणून जास्त उष्णता वातावरणात धरून ठेवली जाते आणि जागतिक हवामानावर परिणाम हाेताे. जागतिक तापमानवाढीमुळे समुद्राच्या पातळीमधे वाढ हाेत आहे आणि पर्जन्यमान बदलत आहे.

स्नेह पर्यावरणाशीः गतिमान संतुलन

महाराष्ट्रातील नामवंत पर्यावरण कार्यकर्ते श्री. दिलीप कुलकर्णी यांनी त्यांचे मासिक विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर pdf रूपात थेट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे.

कोकणचा सडा : एक नैसर्गिक वारसा

डॉ.अपर्णा वाटवे या गेली काही वर्षे पर्यावरण या क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांचा सध्याचा प्रकल्प कोकणवासियांच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. त्या प्रकल्पाबद्दल त्यांच्याच शब्दात वाचा….