आम्ही कोण ?

नमस्कार.

या संकेतस्थळावर मी आणि माझे स्नेही आपले विचार मांडतो. विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, तत्वज्ञान, कथा, बागकाम, पर्यावरण, नाटक अशा वेगवेगळ्या विषयांवर आमची लेखन-निर्मिती आहे. सर्वांना समजावं या साठी बरंचसं लेखन मराठीत केलं आहे. पण काही उच्च तंत्रज्ञान व गणित विषयक लेख मात्र इंग्रजीतच ठेवले आहेत. कारण पारिभाषिक शब्दांमुळे या लेखांचा किचकटपणा वाढतो.

सुमारे २५० पेक्षा अधिक लेख, कथा, व्याख्यानं, तुम्ही या संकेतस्थळावर वाचू, पाहू, ऐकू शकता. अलिकडच्या निर्मितींबद्दलचा तुमचा प्रतिसाद देखील इथेच नोंदवू शकता. या निर्मिती तु्म्हाला लेखमाला या मेनूवर क्लिक करून वाचता-पाहता-ऐकता येतील.

तुम्हाला या निर्मितीबद्दल काय वाटतं हे जरूर व्यक्त करा. हा प्रतिसाद आमच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकतो.

जाहिरात मुक्त, पॉप-अप मुक्त, संकेतस्थळ वाचनाचा तुमचा हा प्रवास सुखाचा होवो.